🟠
“शिवा” 2026 चे राष्ट्रीय पुरस्कार झाले जाहीर
24 नोव्हेंबरला कपिलधार बीड येथे शासकीय महापुजा व राज्यव्यापी मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते वितरण
◾ : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निमित्त श्री क्षेत्र कपिलधार, ता. जि. बीड येथे होणाऱ्या यात्रेमध्ये ‘शासकीय महापुजा’ व ‘भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा’ आयोजित केला जातो. श्री क्षेत्र कपिलधार येथे शिवा संघटनेच्या प्रथेप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार दिले जातात. त्यामुळे यंदाही दि. 24 नोव्हेंबर 2026 मंगळवारी 31 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्याच्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव – लिंगायत समाजाच्या मान्यवरांना ‘शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार’ जाहिर करुन, सन्मान चिन्ह व सन्मान पत्रासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देवुन श्री क्षेत्र कपिलधार येथे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. देशातील वीरशैव – लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय भुषण पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड ‘शिवा’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांनी नुकतीच जाहिर केली आहे. ते पुरस्कार प्राप्त मान्यवर खालील प्रमाणे आहेत.
• शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्काराची श्रेणी –
०१) उत्कृष्ट शिव कथाकार पुरस्कार – गुरू संगणबसव शिवाचार्य महाराज निलंगेकर, ( लातूर )
०२) उत्कृष्ट साहित्यीक पुरस्कार – शिवाजी खंडोजी कांबळे ( नांदेड )
०३) उत्कृष्ट शिव किर्तनकार पुरस्कार – शि.भ.प. गोरोबाकाका नरसिंह शिवणे ( लातूर )
०३ अ) शि.भ.प. उमाशंकर जगन्नाथ मिटकरी ( धाराशिव )
०३ ब) शि.भ.प. कु. पुजा रमेश सातारकर ( बु-हानपूर म. प्र )
०४) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट गायन वादक पुरस्कार – शि.भ. प. दिगंबर नागोराव कु-हाडे ( नायगाव नांदेड )
०४ अ) शि.भ.प. भुजंगराव शिवमुर्ती पळसकर ( परभणी )
०४ ब) शि.भ.प. ओंकार विजयराव काळे ( देलगूर नांदेड )
०४ क) शि.भ.प. विकास किसन हसनाळीकर ( धर्माबाद नांदेड )
०५) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट अखंड शिवनाम सप्ताह कमेटी – शिवा सिध्देश्वर पावन महादेव मंदिर ( छत्रपती संभाजीनगर )
०६) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट वीरशैव भजनी मंडळ पुरस्कार – श्री शिवलिंगेश्वर वीरशैव महिला भजनी मंडळ ( परभणी )
०६ अ) निलंबिका वीरशैव भजनी मंडळ ( बुलडाणा )
०६ ब) शिवा संघटना तालुका शाखा अक्कलकोट ( सोलापूर )
०७ ) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शहर शाखा पुरस्कार – शिवा संघटना शहर पुणे – वैजनाथ आपशेट्टी, रोहीदास बेलुरे, प्रदीप हत्ते ( सर्व पुणे शहर )
०८) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट गाव शाखा पुरस्कार – शिवा संघटना शाखा, रवि कल्पे, अरविंद सासट्टे ( अतनूर जि. लातूर )
०८ अ) शिवा संघटना गाव शाखा पुरस्कार – सिध्देश्वर वाघोले, पंकज पाटील ( हंगरगा जि. धाराशिव )
०९) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट सोशल मिडीया कार्यकर्ता पुरस्कार – सदाशिव रामदास आप्पा साखरे ( आळंदी पुणे )
०९ अ) शिवानंद बळीराम गंगणे ( लोहा, नांदेड )
१०) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शिवा कार्यकर्ता पुरस्कार – कंठयप्पा काशिनाथप्पा मठवाले ( कामारेड्डी, तेलंगणा )
१० अ) मंगेश प्रल्हाद आप्पा शेटे ( लोणार बुलढाणा )
११) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – आशिष शरदआप्पा चेडगे ( साकोली, जि. भंडारा )
११ अ) प्रभाकर दत्तात्रयआप्पा पटणे ( छत्रपती संभाजीनगर )
१२) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट धर्म प्रचारक पुरस्कार – शि.भ.प. हावगीआप्पा नरसिंग देवणे ( लोहा, जि. नांदेड )
१३) शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट सेवाधारी संस्था पुरस्कार – अशोक भगवानराव जाधव, ( नारळीबाग, छत्रपती संभाजीनगर )
याप्रकारे “शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार” शनिवार 31 ऑक्टोबर 2026 ला घोषित करण्यात आले असुन या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार मंगळवार 24 नोव्हेंबर 2026 श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे शिवा संघटनेच्या होणाऱ्या 31 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल – श्रीफळ देवून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक गुरुवर्य आणि पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार, ना. पंकजा मुंडे, ना. अतुल सावे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, माजी विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अभयराव कल्लावार नागपूर व राष्ट्रीय सरचिटणीस श्री. उमाकांतआप्पा शेटे पुणे यांनी दिली आहे.







