एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माझा कलाप्रवास — मनिष सुरेश शिंदे.

माझा कलाप्रवास — मनिष सुरेश शिंदे.

प्रतिनिधी -सारंग महाजन

मी मनिष सुरेश शिंदे. मराठी चित्रपटसृष्टीत लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. माझा कलाप्रवास २०१४ मध्ये गणेशोत्सवातील जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून अभिनय आणि नाट्यविश्वातून सुरू झाला.

२०१५ मध्ये मी कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत ‘हासू बाई हासू’ या नाटकात काम केले. त्याचबरोबर ‘कोणाचं प्रेम कोण करतंय गेम?’ या नाटकात चार वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. या नाट्यप्रवासातून अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्याचबरोबर पडद्यामागील सर्जनशील प्रक्रियेविषयीही कुतूहल वाढत गेले.

२०१६ मध्ये मला चित्रपट दिग्दर्शनाची विशेष आवड निर्माण झाली. त्यानंतर पुण्यातील Deccan Education Society’s Film & Television Institute या संस्थेतून मी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाशी संबंधित प्रशिक्षण पूर्ण केले.

२०१७ ते २०२० या काळात मी विविध चित्रपटांसाठी Assistant Director, Associate Director, Personal Assistant आणि Creative Director अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. या काळात चित्रपट निर्मितीची प्रक्रिया जवळून समजून घेता आली आणि दिग्दर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

२०२१ मध्ये मी स्वतःची Hindchitra Films ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांसाठी जिवंत देखाव्यांचे दिग्दर्शन केले. त्याचबरोबर २० हून अधिक व्यावसायिक जाहिराती आणि २५ हून अधिक म्युझिक व्हिडिओजचे दिग्दर्शन केले.

या संपूर्ण प्रवासात मला सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर काम करण्याची विशेष आवड निर्माण झाली. गोमातेविषयी असलेले प्रेम, तिच्याशी जोडलेली भावनिक नाळ आणि गोसंवर्धन व गोरक्षण या विषयांविषयीच्या जिव्हाळ्यातून माझ्या मनात एका चित्रपटाची संकल्पना आकाराला आली. त्यातूनच ‘धाराऊ’ या मराठी चित्रपटाचा जन्म झाला.

२०२५ मध्ये मी या चित्रपटाचे लेखन आणि निर्मितीचे काम पूर्ण केले. त्यानंतर २०२६ मध्ये ‘धाराऊ’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला आणला.

माझ्यासाठी ‘धाराऊ’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर गोमातेविषयी असलेल्या प्रेमातून आणि सामाजिक जाणीवेतून साकारलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २७ हून अधिक पुरस्कार, नामांकने आणि अधिकृत चित्रपट महोत्सवांतील निवडी मिळाल्या. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

माझा आजवरचा प्रवास हा अभिनयापासून सुरू होऊन दिग्दर्शनापर्यंत आणि नाटकापासून स्वतःचा मराठी चित्रपट साकारण्यापर्यंतचा आहे. या प्रवासात अनेक लोकांचे सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मला लाभले.

यापुढेही चांगल्या कथा सांगण्याचा, सामाजिक विषयांना चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि मराठी चित्रपटसृष्टीत अर्थपूर्ण योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील.

मनिष सुरेश शिंदे लेखक, दिग्दर्शक

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link