एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिरूर एस.टी. स्टँडजवळ दोन कुटुंबांत राडा;

शिरूर एस.टी. स्टँडजवळ दोन कुटुंबांत राडा; प्रेमविवाहाच्या रागातून दगडफेक, चावा घेत डोळ्यांत तिखट चटणी टाकून ७ जणांना मारहाण; १८ जणांवर गुन्हा दाखल
शिरूर (प्रतिनिधी : अशोक पाचुंदकर) :
शिरूर शहरात एस.टी. स्टँडजवळील जयराज लॉजसमोर दोन कुटुंबांमध्ये पूर्वरागातून झालेल्या प्रचंड हाणामारीत दगडफेक करण्यात आली. तसेच चावा घेऊन आणि डोळ्यांत तिखट चटणी टाकून ७ जणांना गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तब्बल १८ जणांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ०३:२५ वाजण्याच्या सुमारास शिरूर एस.टी. स्टँडजवळील जयराज लॉजसमोर हा प्रकार घडला. फिर्यादी अनिता उत्तम लकडे (वय ४० वर्षे, रा. शिंदेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मुलगा महेश लकडे याने आरोपींच्या मुलीशी प्रेमविवाह करून पळून गेल्याच्या कारणावरून आरोपींच्या मनात तीव्र रोष होता. याच पूर्वरागातून आरोपींनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव जमवला आणि फिर्यादीच्या कुटुंबावर हल्ला केला.
मारहाणीत हे झाले जखमी
हल्ला करणाऱ्यांनी फिर्यादी अनिता लकडे, त्यांचे पती उत्तम लकडे तसेच अनिल कोळपे, माखा कोळपे, गणेश लकडे, अक्षय शिंदे, सुनील कोळपे आणि राहुल कोळपे यांना हाताने व दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान अंगावर धावून जात चावा घेणे आणि डोळ्यांत तिखट चटणी टाकून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.
१८ जणांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी फिर्यादी अनिता उत्तम लकडे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९९६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९० व १९१ अन्वये खालील १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
गणेश काशीनाथ शिंदे, माऊली संतप शिंगाडे, संतोष भाऊसाहेब गुलदगड, समीर सर्जेराव शेंडगे, राहुल भाऊसाहेब गुलदगड, दशरथ तुकाराम कोळपे, कैलास तुकाराम कोळपे, बाबुराव भाऊ कोळपे, भाऊ बाबुराव कोळपे, सतीश बाबुराव कोळपे, संपत बाळा शिंगाडे, पंखाबाई सर्जेराव शेंडगे, मनीषा दादाभाऊ शिंगाडे, स्वप्निल बाबुराव कोळपे, अर्चना गणेश शिंदे, लंकाबाई रामदास शिंदे, नारायण सतीश कोळपे, सुमित सर्जेराव शेंडगे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खटिंग करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link