एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भाजपचे उपजिल्हाद्यक्ष रामभाऊ मुळे यांचा स्तुत्य उपक्रम

ऐन दुष्काळात संस्थापक अध्यक्ष रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य व भाजपचे उपजिल्हाद्यक्ष रामभाऊ मुळे यांचा स्तुत्य उपक्रम वाढदिवसानिम्मित झेड.पीच्या शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…

प्रतिनिधी- सारंग महाजन.

हडस पिंपळगाव,राहेगाव,भायगाव, उंदीरवाडी येथील जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,पंचायत समिती सदस्य राहुल शेळके, पोलीस पाटील कारभारी पाटील निघोटे यांची प्रमुख उपस्थिती…

 

ऐन दुष्काळात रामराज्य ग्रुपचे संस्थापक अद्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाद्यक्ष रामभाऊ मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो शालेय विद्यार्थ्याना दिलासा मिळाला असून अभ्यास करण्यासाठी वही, पेन, स्कुल बॅग, पेन्सिल वं इतर शालेय साहित्य वाटप शनिवारी करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव,राहेगाव,भायगाव, उंदीरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पालखेडचें पंचायत समिती सदस्य राहुल शेळके, पोलीस पाटील कारभारी पाटील निघोटे यांच्यासह शिक्षक, गावकरी,भारतीय जनता पार्टीचे वं रामराज्य ग्रुपचे पदाधिकारी प्रमुख उपस्थिती होती.

चौकट :- दुष्काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मायेचा मदतीचा हात….

दरम्यान राज्यात दुष्काळ पडलेला असताना वाढदिवसाच्या खर्च टाळून जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना वही पेन स्कूल बॅग वाटर बॅग व इतर साले साहित्य वाटप केल्यामुळे रामभाऊ मुळे यांच्या या स्तुत उपक्रमाचे ग्रामीण भागातून कौतुक होत आहे व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी अथवा सामान्य नागरिकांनीही वाढदिवसाचा खर्च टाळून गरीब शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भाजपचे उपजिल्हाध्यक्ष रामभाऊ मुळे यांचा आदर्श घ्यावा असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

प्रतिक्रिया :- रामभाऊ मुळे (संस्थापक अद्यक्ष रामराज्य ग्रुप) माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी माझे समर्थक व कार्यकर्ते तसेच रामराज्य ग्रुपचे राज्यातील पदाधिकारी मोठ्या उत्साहात माझा वाढदिवस साजरा करत असतात मात्र गेल्या वर्षी व यावर्षी जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा दुष्काळात पुरता होरपळून निघाला आहे सर्व पिके जमीनदोस्त झाले आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पठडीतला मी कार्यकर्ता असल्याने दुष्काळात मी वाढदिवस साजरा करू शकत नाही त्यामुळे भाजपचे सर्व कार्यकर्ते व रामराज्य ग्रुपचे पदाधिकारी यांना वाढदिवस साजरा न करता बॅनर, हार,फुल, फटाके, शाल यावरचा अवास्तव खर्च टाळून त्याऐवजी तुम्ही मला वह्या,स्कूल बॅग,पेन,कंपास आदिसह विविध शालेय साहित्य भेट म्हणून द्या असे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत मला सर्वांनी मोठ्या प्रमाणावर शालेय साहित्य वाढदिवसानिमित्त भेट दिली व मी जो खर्च वाढदिवसा करणार होतो त्या खर्चातून मीही शालेय साहित्य खरेदी केले असून जिल्ह्याभरातील जिल्हा परिषदच्या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आम्ही वाटप करणार आहोत त्यातील पहिला टप्पा वैजापूर तालुक्यातील अनेक गावात शनिवारी शालेय साहित्य वाटप करून पूर्ण करण्यात आला असून कन्नड गंगापूर छत्रपती संभाजीनगर व इतर तालुक्यातही आम्ही शालेय साहित्य वाटप करणार आहोत त्यामुळे इतर राजकीय प्राधिकार्‍यांनाही मी आवाहन करतो की आपणही आपल्या वाढदिवसावर होणारा अवास्तव खर्च टाळून दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना वं शालेय विद्यार्थ्याना जी मदत करता येईल ती करावी.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link