एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगरात प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची वाहतूक उघड; बोलेरो पिकअपसह मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगरात प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची वाहतूक उघड; बोलेरो पिकअपसह मुद्देमाल जप्त

उप संपादक | प्रणित काठोके

मुक्ताईनगर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला वाहतूक करून विक्री करण्याच्या संशयावरून मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता मुक्ताईनगर पोलिसांना एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पथकाच्या मदतीने वाहनाची तपासणी केली.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता मागील बाजूस विनालेबलच्या सिलबंद गोण्या आढळून आल्या. त्यामध्ये सुगंधित पान मसाला आणि प्रीमियम झेड एन-०२ जाफरानी जर्दा असा प्रतिबंधित साठा आढळला. अनुक्रमे ६,७५० आणि ६,००० पाकिटे जप्त करण्यात आली.
तक्रारीतील नोंदीनुसार, जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची किंमत सुमारे १५ लाख ८८ हजार ५०० रुपये, तर बोलेरो पिकअप वाहनाची अंदाजे किंमत ३ लाख २५ हजार रुपये असल्याचे नमूद आहे. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १९ लाख १३ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील वाहन चालकाचे नाव शुभमसिंग विद्यराम (वय २५, रा. निनावाचा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) असे तक्रारीत नमूद आहे. वाहन क्रमांक HR 84 1073 असल्याची नोंद आहे. चालकाकडे वाहनासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थ मानवी आरोग्यास घातक असल्याने त्यांची साठवणूक, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मालाचे नमुने पुढील विश्लेषणासाठी घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link