विश्वकर्मीय समाजाच्या सामाजिक योगदानाचा गौरव; ‘नॅशनल प्राईड सोशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड 2026’ सोहळा उत्साहात
प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
पुणे : विश्वकर्मीय समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांच्या योगदानाचा गौरव करत सामाजिक एकतेचा संदेश देणारा ‘नॅशनल प्राईड सोशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड 2026’ सन्मान सोहळा संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात सामाजिक कार्य, क्रीडा, समाजप्रबोधन, कला व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास मा. DYSP दीपक चव्हाण, डॉ. श्री महंत श्रीकांत दासजी धुमाळ महाराज (महाकाल भक्त, उज्जैन) तसेच शिवव्याख्याती व लेखिका सौ. सायली गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सिनेअभिनेता व ‘होम मिनिस्टर’ फेम क्रांती नाना मळेगावकर यांना युवा प्रेरणा पुरस्कार, गंधर्व बाळू गराडे यांना क्रीडा पुरस्कार, ह.भ.प. दिनेश महाराज केदारी यांना समाज प्रबोधन रत्न पुरस्कार, रवींद्र रायकर यांना विशेष प्राविण्य पुरस्कार, तर समाजभूषण गजानन काका वानखेडे यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सर्व मान्यवरांना ‘नॅशनल प्राईड सोशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड 2026’ नेही सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ विश्वकर्मीय समाजबांधवांसह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. हनुमंतराव गायकवाड, हनुमंतराव पांचाळ, गणपत बारवकर, गुलाबराव खिलारे महाराज, ज्योती बोरसे, गायत्रीताई क्षीरसागर, मनीषा सुतार, मनीषा रायकर, शुभदा धामापूरकर, सोनाली गरुड, रुपाली भालेराव, डॉ. स्नेहल भालेराव, धनश्री चौधरी, कल्याणी कदम, राजेंद्र सुतार, बाळासाहेब टकले, कमलाकर ठोंबरे, कोमल शिंदे, गणेश सुतार, मनोज गरुड, स्वरित पांचाळ, लक्ष्मणराव सणस, आकाश प्राणप्रितवार, दिनेश केदारी, सागर जानेराव, सचिन दिवेकर, ज्ञानोबा रायरीकर, कल्याण पांचाळ, प्रियंका तामकर, किशोर पांचाळ, सुनिता सुतार, कविता सुतार व प्रणव सुतार यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
‘एकी हेच बळ’ हा संदेश देत समाजातील तळागाळात कार्य करणाऱ्या आणि कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
विशेष म्हणजे, छोटी प्रेरणा घेऊन मोठे कार्य करणाऱ्या विश्वकर्मीय समाजातील मुलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश राऊत व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाला नृत्यांगना स्वाती पुणेकर, राहुल टोनी, प्रशांत महाजन, कांता भाऊ राठोड, ज्ञानोबा राऊत, अनंता वांजळे, अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे संपादक संतोष लांडगे, गणेश महाडीक, विजय धावडे, अभिषेक कोंढाळकर यांच्यासह अनेक विश्वकर्मीय समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गणपत बारवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.







