एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंगोली शहरात फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; मारवाडी गल्ली परिसरात खळबळ

हिंगोली शहरात फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; मारवाडी गल्ली परिसरात खळबळ

प्रतिनिधी : माधव मेटकर
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज

हिंगोली : हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी उशिरा संध्याकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आगीचे लोळ आणि फटाक्यांच्या स्फोटांच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिंगोली शहरातील फटाक्यांचे घाऊक व्यापारी गोपाल बासटवार यांच्या मारवाडी गल्लीतील घराला लागून असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाके साठवून ठेवण्यात आले होते. या फटाक्यांच्या साठ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत लगतच्या परिसरात धुराचे आणि आगीचे लोळ पसरले.
फटाक्यांच्या स्फोटांमुळे परिसरात जोरदार आवाज होत असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेत काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, जखमींची संख्या व नुकसानीचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
या घटनेबाबत अधिकृत माहिती व प्रशासनाचा पंचनामा समोर आल्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link