एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

खालापूर पोलिस स्टेशनमध्ये सायबर जनजागृती मार्गदर्शन शिबिर:- पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण!

खालापूर पोलिस स्टेशनमध्ये सायबर जनजागृती मार्गदर्शन शिबिर:- पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण!

( रायगड जिल्हा ) प्रतिनिधी.मुकुंद मोरे

खालापूर पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांमध्ये वाढत्या ऑनलाइन फसवणुकीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.ऑक्टोबर हा ‘सायबर सुरक्षा जनजागृती महिना’ म्हणून पाळला जात असल्याने रायगड जिल्हा पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शिबिरामध्ये नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खालील मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
• ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) फसवणूक: सीबीआय (CBI), ईडी (ED) किंवा पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ऑडिओ/व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना धमकावून पैशांची मागणी करणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहणे.
• ओटीपी आणि बँक डिटेल्स: कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत आपला बँक ओटीपी (OTP), पिन (PIN), सीव्हीव्ही (CVV) किंवा नेट बँकिंग पासवर्ड शेअर न करणे.
• फिशिंग आणि संशयास्पद लिंक्स: व्हॉट्सॲप, मेसेज किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या लॉटरी, कर्ज ॲप्स (Loan Apps) किंवा नोकरीच्या खोट्या ऑफर्सच्या लिंक्सवर क्लिक न करणे.
• सोशल मीडिया सुरक्षितता: फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा.
फसवणूक झाल्यास त्वरित खालील हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन खालापूर पोलिसांनी केले आहे:
• राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक: १९३० (1930) वर तात्काळ कॉल करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर,पोलीस उप निरीक्षक पूजा चव्हाण मॅडम, किशोर पवार उप नगराध्यक्ष खालापूर नगर पंचायत, मनोज पारठे पोलीस पाटील वणवे, हरेश मोडवे, पांडुरंग मगर, संदीप पवार, गजानन मोरे, विलास पारंगे, सुरज पारठे, शैलेश घोलप, सुनील पारंगे, ऋषिकेश गायकवाड, अक्षय मणेर, सुरज गायकवाड आदी नागरीक उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link