एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेनेचा मोर्चा

दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेनेचा मोर्चा

तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर.

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ
करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत
द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने

सोमवारी (दि. ७) तहसील कार्यालयावर
धडक मोर्चा काढण्यात आला.

शिवसेना नेते बाबा पाटील व
आमदार प्रवीण स्वामी यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख
सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून
मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी
करत मोर्चा तहसील कार्यालयावर
पोहोचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन
देण्यात आले. पावसाअभावी खरीप
पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी
आर्थिक संकटात आहे. त्यामुळे तालुका
दुष्काळग्रस्त जाहीर करून आर्थिक
मदत व जनावरांसाठी चाऱ्याची
व्यवस्था करावी, २०२० पासून
प्रलंबित पीकविमा व अनुदानाची
उमरगा तहसील कार्यालयावर मोर्चा काढताना शिवसेना
(उबाठा) पदाधिकारी व कार्यकर्ते.
रक्कम तातडीने द्यावी, तसेच आगामी
रब्बी हंगामासाठी मोफत खते-बियाणे
उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी
करण्यात आली. शेतीसाठी १२ तास
अखंडित वीज, २१ टीएमसी पाणी व
नदीजोड प्रकल्प पूर्ण करणे, औद्योगिक
वसाहतीला सुविधा देऊन स्थानिकांना
रोजगार देणे, तसेच रस्ते, शाळा व
शासकीय रुग्णालयांची स्थिती सुधारणे
आणि रिक्त पदे भरण्याची मागणीही
करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र
आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात
आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रजाक
अत्तार, हरी जाधव, विजयकुमार नागणे,
विजयकुमार तळबोगे, रणधीर पवार,
किरण कुकुर्डे, सिद्धराम हत्तरगे, मारुती
थोरे, आप्पाराव गायकवाड, अण्णाराव
माने, संतोष जाधव, माधव
यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link