एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार-पॅन कार्डावरून ओळख पटविण्याचे प्रयत्न

भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार-पॅन कार्डावरून ओळख पटविण्याचे प्रयत्न

उप संपादक | प्रणित काठोके

भुसावळ : भुसावळ रेल्वे यार्ड पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका गोडाऊनमध्ये पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाचा खालचा भाग कुजून खाली पडलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे यार्ड परिसरातील गोडाऊनमध्ये मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एक पाकीट आढळून आले. या पाकिटामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच फोटो मिळून आले.

आधार कार्डवरील माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव योगेश विजय वाघधरे (वय २३, रा. ठाणेगाव, ता. कारंजा, जि. वर्धा) असे असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भुसावळ पोलिसांनी कारंजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीबाबत माहिती घेतली.

कारंजा पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ३०/२०२६, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी नोंद करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या मिसिंग तक्रारीनुसार विजय रामचंद्र वाघधरे यांनी आपला मुलगा योगेश हा १२ जुलै २०२६ रोजी उज्जैन येथे जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना भुसावळ येथे बोलावण्यात आले आहे. कुटुंबीयांकडून ओळख पटवल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सदर तरुणाने आत्महत्या केली की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link