एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुण्यात शिक्षकांच्या जाचाला कंटाळून नगरच्या भाग्यश्रीने संपवले जीवन, अकॅडमीच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल

पुण्यात शिक्षकाच्या जाचाला कंटाळून नगरच्या भाग्यश्रीने संपवले जीवन, अकॅडमीच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल, भाग्यश्री चे खाकीचे स्वप्न अधुरेच… (पुणे जिल्हा) प्रतिनिधी . आळेफाटा येथे खाजगी अकॅडमीतील शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या पोलीस दलात भरती होऊन देशसेवेचे आणि कुटुंबाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने अकॅडमी शिक्षकांच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना आळेफाटा येथे (दि.10) ऑगस्ट रोजी घडली. भाग्यश्री भास्कर भंडारी असे मयत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी सह्याद्री अकॅडमीचा शिक्षक मयुर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यश्री भंडारी ही मूळची आळकुटी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी असून,आळेफाटा येथे राहून पोलीस भरतीचा सराव करत होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रसंगात शिक्षक मयुर डुंबरे याला पोलीस ठाण्यात जावे लागले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून डुंबरे याने भाग्यश्री हिला टार्गेट करण्यास सुरुवात केली. वर्गात तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर सतत अपमानास्पद वागणूक देणे, आणि तिचा मानसिक छळ करणे सुरू होते. या रोजच्याच त्रासाला कंटाळून अखेर भाग्यश्रीने राहत्या खोलीत गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपवली.
मयत भाग्यश्रीची बहीण शितल भंडारी ही स्वतः शासकीय सेवेत कार्यरत आहे. आपल्या बहिणीवर ओढवलेला हा प्रसंग पाहून त्यांनी तात्काळ कायदेशीर पावले उचलत आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक मयुर डुंबरे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link