ग्रेट इंडियन पार्लमेंट अवाॅर्ड २०२६ ने कृष्णा कदम यांचा सन्मान .
प्रतिनिधी मुकूंद मोरेसमाजसेवा , जनकल्याण , वैद्यकीय मदत आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मारुती कदम यांना ग्रेट इंडियन पार्लमेंट अवाॅर्ड २०२६ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने २४ जुलै २०२५ रोजी सन्मानित करण्यात आले.
इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अॅम्बेसेडर्स आॅर्गनायझेशन यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार- २०२६ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कृष्णा यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णा कदम हे आरोग्य ,गरजू नागरिकांना मदत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सक्रियपणे कार्यरत आहेत त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची आणि सामाजहितासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा राष्ट्रीय स्तरावर सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृष्णा मारुती कदम यांनी हा वैद्यकीय मदत कक्षातील माझ्या ११०० सहकाऱ्यांना , कुटुंबीयांना आणि समाजातील सर्व शुभचिंतकांना समर्पित करत, भविष्यातही अधिक जोमाने समाजसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला या सन्मानाबद्दल विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कृष्णा मारुती कदम यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








