एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सचिन कांडगे यांच्या कार्याचे सर्वसामान्यांकडून कौतुक

पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सचिन कांडगे यांच्या कार्याचे सर्वसामान्यांकडून कौतुक

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सचिन कांडगे हे आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे शांतपणे म्हणणे ऐकून, शक्य असेल तेथे कायद्याच्या चौकटीत आणि परस्पर समजुतीने वाद मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
“आपापसातील वाद मिटवा, बंधुभावाने राहा, किरकोळ कारणांवरून भांडणे टाळा आणि समाजात शांतता राखा,” असा संदेश ते नेहमी नागरिकांना देत असतात. कोणतेही काम करताना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि न्याय या तत्त्वांवर त्यांचा भर असतो.
“हे पोलीस स्टेशन जनतेचेच आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि कोणावरही अन्याय होणार नाही,” या भूमिकेतून ते आपले कर्तव्य बजावत असून त्यामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सचिन कांडगे यांच्या संवेदनशील, लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीमुळे पारगाव कारखाना परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही त्यांनी अशाच प्रामाणिकपणे जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link