एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अक्षरदेह परिवाराकडून लक्ष्मीकांत गोंदकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अक्षरदेह परिवाराकडून लक्ष्मीकांत गोंदकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रतिनिधी सारंग महाजन.

नाटकाचा *दीप* स्तंभ

प्रत्येक नाट्यसंहितेची सुरुवात असते या वाक्याने,
“रंगमंच उजळतो तेव्हा…. ” पण हा रंगमंच उजळतो कुणामुळे? तर अप्रकाशित राहणाऱ्या एका प्रकाशयोजनाकारामुळे….. नाटकाचं ग्लॅमर हे प्रत्यक्ष रंगमंचावर दिसणाऱ्या कलाकारांच्या भोवतीच फिरत असतं … परंतु या कलाकारांना दाखवणं ज्यांच्या हातात असतं , तो प्रकाशयोजनाकार मात्र कायम ग्लॅमरच्या बाहेर असतो… म्हणून प्रत्येकाला अभिनय करावा वाटतो, रंगमंचावर दिसावं वाटतं … ते साहजिकच आहे… पण मग नाटकाचं काय ? प्रकाशयोजना, नेपथ्य यासाठी कुणीतरी आपल्या इच्छा आकांक्षांचे बलिदान देणारा व स्वतःला ग्लॅमरपासून अलिप्त ठेवत उपेक्षित राहणारा कलावंत म्हणून काम करणाऱ्यासाठी कमालीचं साहस लागतं , त्याच्या अंगात नाटक मुरलेले आणि त्याचे जीवन नाटकासाठी वाहलेलं असलं पाहिजे… असाच एक समर्पित कलावंत म्हणून ज्यांची ओळख आहे व ज्यांनी केवळ बुलढाणा नाट्यसृष्टीतील उणिव भरुन काढण्यासाठी स्वतःतील अभिनेत्याचे बलिदान देत प्रकाशयोजनेचे काम स्वीकारले व नाटकासाठी खऱ्या अर्थाने *दीप* स्तंभ म्हणून आधार ठरलेले आमचे मार्गदर्शक

*मा. श्री. लक्ष्मीकांत गोंदकर सर*

यांचा आज वाढदिवस… त्यांना अक्षरदेह परीवाराकडून खूप खूप शुभेच्छा !!!!

नाटकाची तात्पुरती गरज भागवावी म्हणून प्रकाशयोजना न करता त्या नाटकाला , कलाकृतीला एका मोठ्या उंचीवर पोहोचवणारी प्रकाशयोजना त्यांनी केली आहे… राज्यातील प्रत्येक मोठ्या शहरातील रंगमंचावर त्यांनी उजेड पाडलेला आहे..‌ बऱ्याचदा कलाकारांचा उजेड पडो ना पडो , पण श्री. गोंदकर सरांनी प्रकाशयोजनेची बक्षिसे आणली आहेत…. आपलं काम प्रामाणिकपणे व झोकून देऊन करणे हेच त्यांना माहिती आहे…. विशेष म्हणजे या क्षेत्रात कमालीचे अपडेट असणारे श्री. गोंदकर सर यांचे टायमिंग व अचूकता वाखाणण्याजोगी आहे. कल्पकता आणि संहितेचा सार पकडून प्रसंगानुरुप प्रकाशयोजनेतील वैविध्य हे त्यांचे वैशिष्ट्य…..
याखेरीस वैद्यकीय क्षेत्रातील राज्यस्तरीय स्टार फॅकल्टी म्हणून देखील त्यांची ओळख आहे… उत्तम वक्ते व नाट्य अभ्यासक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे…

आज वाढदिवसाच्या निमित्ताने सरांचे पुन्हा एकदा अभिष्टचिंतन….( शशिकांत इंगळे सर)

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link