नागपूर पोलीस आयुक्त पदावर तडफदार आयपीएस अधिकाऱ्याची इंट्री; विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतला पदभार !
नागपूर जिल्हा प्रतिनिधी. सतीश कडू
नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील हे रविवारी सायंकाळी नागपूर शहरांत दाखल झाले. यावेळी सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त विनिता चाहू व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. आज रोजी सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तयात आपल्या पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली तर अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे नागपूरची जबाबदारी देण्यात आली. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे 1997 बॅचच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेत एक अत्यंत,तडफदार, डॅशिंग आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते. राज्यांतील सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय पोलीस अधिकाऱ्यांपैकी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून मानले जाते. कठोर कार्यपद्धती, गुन्हेगारी विरोधातील आक्रमक भूमिका आणि तात्काळ निर्णय क्षमतेमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला आळा घालणे, आणि शहरांत कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे. मात्र त्यांच्या या दमदार एंट्रीमुळे नागपूर पोलीस दलाला नव्या नेतृत्वाची दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.*








