एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जिल्हा पोलिसांनी 10 दिवसात केले आंतरजिल्हा शस्त्र तस्करांचे साखळीचा बिमोड ..

पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
दिनांक: 27/06/2026

जिल्हा पोलिसांनी 10 दिवसात केले आंतरजिल्हा शस्त्र तस्करांचे साखळीचा बिमोड ..
08 गावठी कट्टे, 14 काडतुस सह 10 आरोपी जेरबंद ..

प्रतिनिधी रणजीत मस्के

मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना जबर बसविण्यासाठी अवैध अग्निशस्त्र (गावठी कट्टा) स्वतः जवळ बाळगणारे, त्याची तस्करी करणारे व समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करणा-या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
याअनुषंगाने छ. संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दिनांक 13/06/26 ते 22/06/26 या कालावधीत अवैधरीतया अग्निशस्त्र बाळगून व त्यांची खरेदी विक्री, साठवण करून समाजात दहशत आणि गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणा-या गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कारवाई करत 08 गावठी कट्टे, 14 जिवंत काडतुसे 10 आरोपी जेरबंद केले आहे. या कारवाईचे विशेष महत्त्व म्हणजे पोलिसांनी केवळ शस्त्रे जप्ती पुरते न थांबता, जिल्हा बाहेरून गावठी कट्ट्यांचा अवैध शस्त्र पुरवठा आणि विक्री, साठवणूक करणा-या साखळीचे धागेदोरे उलगडले आहेत.
यामध्ये खालील नमूद प्रमाणे गुन्ह्यात अवैध कट्टे व काडतुस जप्त करण्यात आले आहे.

१. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्र गस्त दरम्यान बिडकीन परिसरात सापळा लावून कारवाई करत आरोपी नामे गणेश शिवाजी उघडे रा. मुलानी वाडगाव ता. पैठण याला ताब्यात घेत त्याच्या कडून 01 गावठी कट्टा व 05 जिवंत काडतुस जप्त केले होते. वरिल गुन्ह्यांच्या बिडकीन पोलिसांनी कसोशिने तपास करून शस्त्र बाळगण्या-यासह अवैधरीतया गावठी कट्ट्याचे पुरवठा करणा-या डीलर पर्यंत पोहचून यामध्ये 03 गावठी कट्टे व 03 जिवंत राउंड जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत एकूण 04 गावठी कट्टे व 08 जिवंत काडतुस जप्त करून गावठी कट्ट्याची तस्करी करणारी आंतरजिल्हा टोळीची साखळी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
यामध्ये आरोपी नामे १) गणेश शिवाजी उघडे रा. मुलानी वाडगाव ता. पैठण २) अजय उर्फ रोमन हरिश्चंद्र शिंदे रा. मांडवा ता. गंगापूर (डिलर) ३) राष्ट्रपाल द्रविडराव तुपे रा. उत्तर जायकवाडी ता.पैठण ४) आकाश भिमा इंगळे वय 26 वर्षे रा. शिवाजीनगर, खळवाडी नेवासा जि. अहिल्यानगर (डिलर) ५) संतोष बाबुराव गायकवाड वय 23 वर्षे रा. मारुतीनगर नेवासा जि. अहिल्यानगर ६) निशांत उमेश पन्हाळे वय 25 वर्षे रा. निर्मलनगर, शेवगाव जि. अहिल्यानगर (डिलर) यांना अटक करण्यात आली आहे.

2. स्थानिक गुन्हे शाखेने गंगापूर हद्दीत कारवाई करत आरोपी नामे किशोर शिवनाथ जाधव वय 28 रा. अब्दुलपुर याचे ताब्यातून 01 गावठी कट्टा व 01 जिवंत काडतुस जप्त करून आरोपी अटक केला आहे.

3. बिडकीन पोलिसांनी पुन्हा छापेमारी करून १) आकाश रमेश निकम वय 32 रा. कांचनवाडी ह.मु. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण २) लखन छोटीलाल राठोड वय 30 वर्षे रा. डोगगाव तांडा यांचेकडून 02 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुस जप्त करून आरोपीला अटक केली आहे.

4. स्थानिक गुन्हे शाखने अजिंठा परिसरात कारवाई करत आरोपी आबासाहेब काकासाहेब मिसाळ वय 24 वर्षे रा. जानेफळ दाभाडी ता. भोकरदन जि. जालना यांचेकडून 01 गावठी कट्टा व 01 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

या सर्व आरोपी विरुद्ध कलम 3/25 5/25,(1B),(A),27 भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याकारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गावठी कट्ट्यांचा तस्करी करणा-या टोळीची साखळी तोडण्यात पोलिसांना यश आले असून यामाध्यमांतून भविष्यात घडू शकणारे गंभीर गुन्हे रोखण्यास प्रतिबंध करता आले आहे.

*मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कि, *जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे, त्याची खरेदी- विक्री करणारे तसेच या माध्यमातून दहशत निर्माण करणा-याविरुद्ध जिल्हा पोलीस यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही सर्वोच्च प्राथमिकता असून कायद्या हातात घेणा-याची गय केली जाणार नाही.

नमुद कारवाई ही मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, मा. प्रशांत स्वामी, अपर पोलीस अधीक्षक, श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, पैठण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विजयसिंग राजपुत, पो.नि. स्थागुशा, स.पो.नि. निलेश शेळके, बिडकीन, लघु घोडे, महेश घुगे, पो.उप.नि.स्था.गु.शा. एम.के. निकाळजे, पोलीस अंमलदार कासिम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर, जीवन घोलप, वाल्मिक निकम, संजय चव्हाण, योगेश नाडे, वाजेद शेख, उमेश गुढे, हनुमान धनवे, विठ्ठल डोके, सनि खरात, योगेश तरमळे यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link