एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या २८ जून सभेच्या नियोजनासाठी उमरगा-लोहारा येथे आढावा बैठक संपन्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या २८ जून सभेच्या नियोजनासाठी उमरगा-लोहारा येथे आढावा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ.

उमरगा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धाराशिव येथे दि. २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या नियोजनासाठी दि. २५ रोजी उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय सभागृहात उत्साहात पार पडली.

या बैठकीत सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या तसेच जास्तीत जास्त शिवसैनिक व नागरिकांनी सभेला उपस्थित राहावे, यासाठी नियोजन आणि जनसंपर्क मोहिमेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस संपर्कप्रमुख सुनील काटमोरे साहेब, (उपसंपर्कप्रमुख मा.नंदू निंबाळकर साहेब ), धाराशिव जिल्हा लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ पत्रकार व जिल्हा प्रतिनिधी मा. श्री.लाडलेसाब नदाफ साहेब, जिल्हा उपप्रमुख मा.बसवराज वरनाळे साहेब, ( तालुका उपप्रमुख मा.मौलाली नदाफ साहेब) , शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार नागणे,शिवशेनेचे धीरज बेळंबकर साहेब ,तसेच मा. आमदार प्रवीण स्वामी यांचे पीए मा श्री.शिवकन्त सहेब शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी २८ जून रोजी धाराशिव येथे होणारी सभा ऐतिहासिक आणि यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांनी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link