एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आग तात्काळ नियंत्रणात; मोठा अनर्थ टळला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आग तात्काळ नियंत्रणात; मोठा अनर्थ टळला
——————————

प्रतिनिधी / अनिल चव्हाण


परभणी, दिनांक 25 जून रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ आग आटोक्यात आणली.महापौर सय्यद इकबाल यांनी घटनास्थळी उभे राहत सुचना केल्या.

तहसीलदार श्री. संदीप राजापूर तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. पवन खांडके यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीटीसी (DPTC) हॉलच्या मागील गेट व जिन्यामध्ये ठेवलेल्या साहित्याला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.सदर घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली आहे.घटनास्थळी महापौर सय्यद इकबाल यांनी तातडीने भेट देत आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या.त्यांनी पाहणी केली.यावेळी मनपाचे सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
अग्निशामक दलाचे विभाग प्रमुख दीपक कानोडे,सय्यद नजीम (फायरमन)सर्जेराव मुंढे (फायरमन) इनायत अली (वाहन चालक) यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link