एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

चाळीसगाव शहरात पहाटेच्या कोम्बिंग ऑपरेशनची धडक कारवाई; 80 गुन्हेगारांची तपासणी, 39 लाखांची वाहने डिटेन

चाळीसगाव शहरात पहाटेच्या कोम्बिंग ऑपरेशनची धडक कारवाई; 80 गुन्हेगारांची तपासणी, 39 लाखांची वाहने डिटेन

उप संपादक | प्रणित काठोके

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने दिनांक 24 जून 2026 रोजी पहाटे 2.00 ते 4.00 वाजेदरम्यान विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या धडक मोहिमेत रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार आरोपी तसेच संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या कारवाईत अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या असून विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी ऑपरेशनदरम्यान रेकॉर्डवरील तब्बल 80 आरोपी व गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या घरांची झडती घेतली. यापैकी 44 आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. यामुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.

कारवाईदरम्यान आर्म्स ॲक्ट कलम 4/25 अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने या प्रकरणांचा तपास अधिक गतीने सुरू आहे.

मुंबई पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये संशयित स्वरूपात वापरल्या जाणाऱ्या तीन आलिशान वाहनांवरही कारवाई करण्यात आली. यामध्ये MH 20 EJ 4890 क्रमांकाची व्हॅगनार, MH 14 EP 7358 क्रमांकाची ऑडी आणि MH 43 AR 3409 क्रमांकाची वरना या वाहनांचा समावेश असून सुमारे 39 लाख रुपये किमतीची ही तीन वाहने पोलीसांनी डिटेन केली आहेत.

याशिवाय विविध न्यायालयीन प्रकरणांतील एकूण 8 पकड वॉरंटची बजावणी करण्यात आली. प्रोहिबिशन कायद्यांतर्गत तीन प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून अवैध मद्यनिर्मितीसाठी वापरले जाणारे कच्चे रसायनही नष्ट करण्यात आले. तसेच तीन व्यक्तींना समन्स बजावण्यात आले.

संपूर्ण कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक आणि चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत 1 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक, 60 पोलीस अमलदार, स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) पथके तसेच 3 RCP पथकांचा सहभाग होता.

चाळीसगाव शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link