पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल कडेगांव पोलीस ठाणेचे नवे कारभारी, कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देणार!
सौ. अनुजा कारखेले-देवरे (सांगली जिल्हा) प्रतिनिधी.
सांगली जिल्हा पोलीस दलात गेल्या आठवड्यात जवळपास 8 पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशात करण्यात आल्या होत्या. यामध्ये कडेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांच्याही बदलीचा समावेश होता. त्यांच्या रिक्त जागेवर पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांची नियुक्ती झाली असून पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस प्रशासनात ओळखले जातात. सांगली जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे आता त्यांच्याकडे कडेगांव पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक तोरडमल त्यांच्या नव्या एन्ट्री मुळे कडेगांव पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाल्याचे परिसरांतून बोलले जात आहे.*








