एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना शिरूर पोलिसांकडून अटक; दोन तासांत कारवाई

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना शिरूर पोलिसांकडून अटक; दोन तासांत कारवाई

शिरूर : प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

निमोणे (ता. शिरूर, जि. पुणे) गावच्या हद्दीत घोड नदी पात्रात शेतातील बांधाच्या कारणावरून झालेल्या वादातून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना शिरूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 18 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास निमोणे गावच्या हद्दीत घोड नदीच्या पात्रामध्ये फिर्यादी दत्तात्रय नानासो काळे (वय 29 वर्षे, व्यवसाय शेती, रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शेतातील पाण्यासाठी केलेल्या बांधाच्या कारणावरून आरोपींकडे विचारणा केली.
यावेळी आरोपी संकेत ज्ञानदेव काळे (वय 26), शुभम ज्ञानदेव काळे व समीर प्रकाश शेलार (वय 23, सर्व रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्यादी व त्यांचा भाऊ अक्षय काळे यांना मारहाण केली. डोक्यात, तोंडावर, पाठीवर व छातीवर मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 574/2026 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(1), 115(2), 351(2), 351(3), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहिती व बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.
पोलिसांनी आरोपी संकेत ज्ञानदेव काळे व समीर प्रकाश शेलार यांना गोलेगाव-कर्डे रोड परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शिरूर पोलीस स्टेशनच्या या जलद कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link