मांडवगण फराटा फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सातारा जिल्ह्यातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शिरूर : प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवगण फराटा येथे क्रिकेट सामन्याच्या कारणावरून झालेल्या फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे.
मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर दि. 19/03/2026 रोजी क्रिकेट सामन्याच्या आयोजनाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. यावेळी एकमेकांवर अग्निशस्त्रातून फायरिंग करण्यात आली होती. या घटनेनंतर शिरूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 235/2026 व 236/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी
अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील, वय 31 वर्षे, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे (मूळ रा. गोद्री, ता. जामनेर, जि. जळगाव)
सत्यम उर्फ पप्पू दत्तात्रय कड, वय 26 वर्षे, रा. कडाची वाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे
हे दोन्ही आरोपी गुन्हा केल्यानंतर फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सातारा जिल्ह्यातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. शुभम कुमार, पुणे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी केली.
या पथकामध्ये शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे तसेच पोलीस कर्मचारी अभिजीत सावंत, हनुमंत पासलकर, पोलीस अंमलदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ, तुषार भोईटे, सागर नामदास, धीरज जाधव, शुभम चव्हाण, निरज पिसाळ, विजय शिंदे, सचिन भोई, नितेश थोरात, निखिल रावडे, अंबादास थोरात, दादाराव नागरे, अजय पाटील, भालसिंग आदींनी सहभाग घेतला.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
— सीनियर क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य
अशोक पाचुंदकर








