एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ठाण्यात धक्कादायक घटना रस्त्यावर थुंकण्यास हटकल्याच्या रागातून कॅब चालकांकडून वयोवृद्धाला मारहाण

ठाण्यात धक्कादायक घटना रस्त्यावर थुंकण्यास हटकल्याच्या रागातून कॅब चालकांकडून वयोवृद्धाला मारहाण!
प्रतिनिधी मुकूंद मोरे

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ ज्येष्ठ नागरिकाला मारहाण झाल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत आरोपी चालकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर थुंकल्याबद्दल जाब विचारल्याने चालकाने ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून आरोपीच्या हातात दगड असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला वर्तक नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. आता या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील BNS खुनाच्या प्रयत्नासंदर्भातील संबंधित कलमांखाली कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या घटनेमुळे ठाणे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.

ठाणे प्रकरणात मोठी कारवाई! मारहाण करणाऱ्या चालकावर ३०७ लावण्याचे शिंदेंचे निर्देश

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link