एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

संयम फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित अहिरे, उपाध्यक्ष महेश पटेल, सरचिटणीस साईराज ढेपले व चेतन खरे यांच्या पुढाकारातून वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाज आणि पर्यावरणासाठी सकारात्मक योगदान देण्याची संधी आहे, या भावनेतून संयम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
संयम फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष सुमित अहिरे, उपाध्यक्ष महेश पटेल, सरचिटणीस साईराज ढेपले आणि चेतन खरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरणाचे संतुलन राखणे, हरित क्षेत्र वाढविणे आणि भावी पिढीला स्वच्छ व हिरवेगार वातावरण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करत पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. वाढदिवस साजरा करण्याची ही पर्यावरणपूरक संकल्पना समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
संयम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे सातत्याने समाजहिताचे कार्य करत असून भविष्यातही अशा विविध जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वृक्षारोपणासारख्या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link