एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पारनेर तालुक्यामध्ये गावठी हातभट्टी व विदेशी दारु विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज रणजीत मस्के

पारनेर तालुक्यामध्ये गावठी हातभट्टी व विदेशी दारु विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे, 64,170/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, अमोल आजबे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन रवाना करण्यात आले.
पथकाने दिनांक 29/05/2026 रोजी पारनेर तालुक्यातील शिरापुर गांवचे शिवारामध्ये गावठी हातभट्टी, व आप्पा ढाबा, सावरगांव शिवार, ता. पारनेर या ठिकाणी छापे टाकुन खालीलप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्देमाल किंमत
1 पारनेर 418/2026 महाराष्ट्र दारुबंदी का. क. 65 (ई)(फ) प्रमाणे 1) स्वप्निल सयाजी उचाळे रा. शिरापुर, ता. पारनेर 53,000/-
त्यामध्ये 30 लि. तयार दारु व 1000 लि. कच्चे रसायन
2 पारनेर 413/2026 महाराष्ट्र दारुबंदी का. क. 65 (ई) प्रमाणे 1) परेश साहेबराव चिकणे रा. चिकणेवाडी, सावरगांव, ता. पारनेर 12,170/- विदेशी दारु
* एकुण 02 गुन्हे, 02 आरोपी व 65,170/- रुपये किमतीचा मुद्देमाल
सदरची कारवाई मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link