एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शेतवस्तीवर घरफोड्या करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

शेतवस्तीवर घरफोड्या करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांची कारवाई.

रणजीत मस्के

फिर्यादी गोपीनाथ माणीक मोरे वय 44 वर्ष व्यवसाय शेती रा. विहामाडवा शिवाजीनगर ता पैठण जि. छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली की, दि. 18/04/2026 रोजी रात्री 09.30 वाजेच्या सुमारास शिवाजी नगर शिवारातील शेत गट नं. 106 मध्ये राहत्या शेत वस्तीवर रात्री झोपलो असता दि. 19/04/2026 रोजीचे रात्री 02.00 वाजेच्या सुमारास माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी उठलो व पाहिले असता दोन ईसम घराजवळुन पळतांना दिसले. त्यावरुन मला समजले की घरात चोरी झालेली आहे. नंतर मी घरातील सामानाची पाहणी केली घरातील ।) 15,000/-रूपये किमतीच्या 3 ग्रॅम सोन्याच्या कानातील बाळ्या जुवा.कि.अं 2) 17,500/- रूपये किंमतीच्या साडेतिन ग्रॅमचे सोन्याचे कानातील वेल जु.वा.कि.अ. 3) 12,500/- रू किंमतीची नाकातील अडीच ग्रॅम सेन्याची नथ जू.वा.कि.अं. 4)25,000/- रूपये किमतीचे गल्यातील सोन्याच मणी 5 ग्रॅम वजनाचे जू.वा.कि.अं 5) 5,000/- रूपये किमतीचा एक REAIME C.73.5.G कंपनीचा मोबाईल ज्याचा IMEI NO 862304070310035 (2) 862304070310027 ज्यामध्ये जिवो कंपनीचे रसिमकाड 952773266३ असा जूना वापरता कि.अं. 6) 20,000/- रूपये रोख रक्क्म ज्यामध्ये 500 रूपये दराच्या 25 भारतीय चलनी नोटा एकूण 95,000/- रूपये किंमतीचे दागीणे व मोबाईल फोन हे चोरुन नेलेले आहेत. त्यावरुन पोलीस ठाणे पाचोड येथे गुरनं 131/2026 कलम 305 (अ),331(4),3(5) भा. न्या माहीता 2023 प्रमाणे दिनांक 19/04/2026 रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण श्री. प्रकाश भा. जाधव व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंग राजपुत स्था.गु.शा. पथक हे गुन्हा दाखल झाल्यापासुन सदर घरफोडीचा तपास करीत होते. समांतर तपास करत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सदरची चोरी ही 1) उदया मजल्या भोसले वय 45 वर्ष रा. टाकळी अंबड ता. पैठण जि.छ. संभाजीनगर याने त्याचा साथीदार 2) राजेश ऊर्फ हिंदोयासा दिलीप पवार रा. वाळुज यांनी केली असल्याबाबत खात्रीशीर माहीती प्राप्त झाली.

सदर माहीतीची पडताळणी करून संशयीत आरोपीचा शोध घेतला असता माहिती मिळाली की, सदर आरोपी हे दिनांक 30/05/2026 रोजी टाकळी अंबड कडुन विहामांडवा गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल विकण्यासाठी येत आहेत, त्यावरुन स्था.गु.शा.पथक यांनी विहामांडवा गावातुन टाकळी अंबड कडे जाणाऱ्या रोडवरील पुलालगत स्मशानभूमीजवळ बाजुला रोडवर 17.00 वा. सापळा लावुन थांबले व मोटार सायकलवर आरोपी येताच त्यांना शिताफीने अडवले असता पाठीमागे बसलेला इसम यास पोलीस असल्याचे चाहुल लागताच गाडीवरुन उतरुन नाल्यालगत असलेल्या उसाच्या शेतात पळून गेला. मो.सा. चालविणारा इसमांस थांबवून पकडुन त्यास त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव उदया मजल्या भोसले वय 45 वर्ष रा. टाकळी अंबड ता. पैठण जि.छ. संभाजीनगर असे सांगीतले. व पळून गेलेल्या इसमा बाबत विचारपुस केली असता त्याचे नाव 2) राजेश ऊर्फ हिंदीवाला दिलीप पवार रा. वाळूज असे सांगीतले. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचा साथीदार नामे राजेश ऊर्फ हिंदीवाला दिलीप पवार रा. वाळूज यांचेसह मोटार सायकलवर जाऊन केला असल्याची कबुली देऊन त्या घरातील पेटीत ठेवलेले कानातील बाळया, वेल, नथ, मणी, मोबाईल, व नगदी रोख रक्कम 20,000/- रुपये असे एकुन 95,000/- किंमतीचे चोरुन नेले असल्याची कबुली दिली.

त्यावरून सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 1) 3 ग्रॉम वजनाचे कानातील 2 नग सोन्याचे बाळया 48000/- रुपये किमंतीचे कि.अ. 2) सोन्याचे 6 गोल मनी 3000/- कि.अ. 3) गुन्हा करतेवेळी गुन्ह्यात वापरलेली एक काळया व लाल पटयाची रंगाची मोटार सायकल हिरो स्प्लेंडर कंपनीची मो.सा. जिचा आरटीओ दिसता पासींग क्रं. MH 20 HG 4245 जिचा चेसीस क्र. MBLHAW487H5D83639 किंमत 80,000/- रुपये येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा एकुण-1,31,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीस मुद्देमालासह पो.स्टे. पाचोड येथे हजर केले व पुढील अधिक तपास पो.स्टे. पाचोड पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रकाश भा. जाधव व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत स्वामी, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंग राजपुत, पो.उपनि. महेश घुगे, सचिन राठोड, सुनिल गोरे, पो. अं. बलबिरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे, जिवन घोलप यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link