एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलिस अधीक्षक कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

पोलिस अधीक्षक कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
……………………………..
प्रतिनिधि, अब्दुल कदीर पत्रकार गिरड जिला वर्धा
…………………………….

वर्धा : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महान व्यक्तिमत्त्वास श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. आपल्या मनोगतात पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजासाठी मार्गदर्शक असून त्यांनी दिलेले समानता, न्याय व बंधुत्वाचे मूल्य जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

या प्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link