एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

साताऱ्यात किरकोळ कारणावरून युवकांचा खून; सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या 

साताऱ्यात किरकोळ कारणावरून युवकांचा खून; सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

(सातारा जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.

सातारा जिल्ह्यातील येथील आरफळ गावात पेट्रोल चोरीचा आळ घेतल्याने झालेल्या वादांतून अमर मुगुटराव नलगे (वय 45 ) याच्या डोक्यात लोखंडी खोरे मारून त्याचा खून करण्यात आला ही धक्कादायक घटना रविवारी दुपारच्या सुमारांस घडली घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आरफळ गावात धाव घेतली. या घटनेमुळे काहीकाळ गावात तणावाचे वातावरण होते. सातारा तालुका पोलिसांनी जलद गतीने तपासाची सूत्रे हलवत आरोपी नामे ऋषिकांत मारुती कासकर याला अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मृत अमर नलगे आणि आरोपी ऋषिकांत कासकर हे शेजारी-शेजारी राहतात तर ऋषिकांत यांच्या गाडीतील पेट्रोल चोरीस गेले होते. यावेळी त्यांने अमर नलगे यांच्या मुलावर आळ घेतला होता. या झालेल्या वादात पुन्हा रविवारी दुपारी दोघांची भांडणे सुरू होती. अमर यांची पत्नी रूपाली नलगे ही त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आली होती. पण रागांच्या भरात ऋषिकांतने घरात जावुन लोखंडी खोरे अमरच्या डोक्यात मारले, यात अमर गंभीर जखमी झाला उपचारांदरम्यान अमरचा मृत्यू झाला. अमर हा सातारा शहरांतील एका सराफपेढीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. अमरच्या कुटुंबाची जबाबदारी अमरवर होती. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चांत आई व पत्नी दोन मुले असा त्याचा परिवार आहे. सदर खुनाच्या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा तालुका पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कुडकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुदर्शन काटकर गुन्हे प्रकटीकरणचे अभिजीत गुरव मनोज गायकवाड दादा स्वामी संदीप पांडव मोलाजी चव्हाण सुनील भोसले अजित निकम शिवाजी वायदंडे सिंधू ननावरे वनिता कणसे सातारा तालुका पोलीस ठाणेकडील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link