शिवाजी विद्यालय सिडको शाळेतील एका मुलीला फूस लावून पळून नेण्याचा प्रयत्न सेवकांच्या सतर्कतेने फसला
सखाराम कुलकर्णी
नांदेड- सिडको भागातील पाण्याच्या टाकी जवळील शिवाजी विद्यालयात नववी वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलीस काही युवकांनी पळवून नेत असताना शाळेतील सेवकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला.
शिवाजी विद्यालय सिडको नांदेड येथे नववी वर्गात शिकत असलेली युवती शाळेत आली होती. त्याचवेळी दोन युवक मोटरसायकलवर शाळेच्या आवारात येऊन त्या मुलीला फूस लावून पळवून नेऊ लागले. मुलीने आरडाओरड सुरू केल्यावर शाळेतील सेवक धावून आले व सेवकांच्या सतर्कतेने फार मोठा अनर्थ टळला. व त्या युवकांचा मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला. आरडाओरड झाल्यावर युवक पळून जाण्यात यशस्वी झाले .शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रवी शिवाजी जाधव यांना शाळेतील कर्मचाऱ्यांनी सदरील घटनेची माहिती सांगून शाळेत येण्यास विनंती केली. पण मला शाळेत येण्यास वेळ नाही असे कारण मुख्याध्यापकांनी सांगितले .हे मुख्याध्यापक संस्थेचे माजी अध्यक्ष व तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांचे पुत्र आहेत. व हे शाळेत कधीतरी येतात. अशी माहिती शाळेतील कर्मचार्यांनी दिली. घटना घडल्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर तसेच दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही पाहून वापस गेले. हे प्रकरण उजेडात न येण्याची दक्षता घेऊन शोध सुरू केला.या अज्ञात युवकांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. नांदेड शहरात गुंडागर्दी, हत्या ,प्रेम प्रकरण, पळवा पळवी असे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकात भयभीत वातावरण निर्माण झाले. व पोलिसांवरचा विश्वास उडत चालला.








