एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात शिवसेना आक्रमक

“मंठ्यात वाळू माफियांचा हैदोस; प्रशासनाच्या डोळ्यावर ‘माफियांची पट्टी’- तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे.
——————————–
अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात शिवसेना आक्रमक.

मंठा – तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि जीवघेण्या वाहतुकीविरोधात तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करून निवेदन देण्यात आले. हजारो ब्रास वाळूची खुलेआम चोरी होत असताना संबंधित प्रशासन मात्र संशयास्पद शांत भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

तालुक्यात दिवस-रात्र अवैध वाळू उत्खनन सुरू असून शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. नदीपात्रांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असतानाही महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कारवाईस टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अतिवेगाने धावणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला आणि शेतकरी भयाच्या वातावरणात प्रवास करत असून अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तरीही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने “नेमके कोणाच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी अवैध वाळू व्यवसाय तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.“जर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई केली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल,” असा आक्रमक इशाराही यावेळी देण्यात आला.

तालुक्यात वाढत चाललेल्या वाळू माफियांच्या दहशतीमुळे आता सर्वसामान्य नागरिक प्रशासनाच्या भूमिकेकडे संशयाने पाहत असून, येत्या काळात हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link