स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई
मिरज शहर पोलीस ठाणेकडील खूनासहीत मोक्याच्या गुन्हयातील परागंदा आरोपीस केले जेरबंद
पोलीस स्टेशन मिरज शहर
प्रतिनिधी रणजीत मस्के
२८७/२०२६ बी.एन.एस. कलम १११ (२) (अ), १०३ (१), १८९,१९०, ६१ (२) आर्म अॅक्ट ४.२५ सह महा.पो.का.३७ (१), (३)/१३५ सह महा. संघ. गुन्हेगारी अधि. ३ (१) (i).३ (१) (ii), ३(२). ३(४). ४ प्रमाणे
गु.दा.ता वेळ
गु.घ.ता वेळ दि. २७/०९/२०२५ रोजी २१.४५ वा.चे सुमारास
२८/०९/२०२५ रोजी ०७.४४ वा
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मा. उप.वि.पो.अधि. विभाग, विटा विपुल पाटील यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, स्था. गु. अ. शाखा, पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील
पोहेकॉ / अतुल माने, पोना/सुशिल मस्के, पोकों/ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी पोकॉ/, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी, शांता कोळी सायबर पोलीस ठाणे
अटक दिनांक दि. १५.०३.२०२६ रोजी
आरोपी नाव व पत्ता
महमदशिराज ऊर्फ सोहेल अब्बास आगलावणे वय-२६ वर्षे राहणार-पाटील हौद, ब्राम्हणपूरी, मिरज
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून गंभीर शरीराविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, स्था. गु. अ. शाखा यांनी पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन गंभीर शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे परागंदा आरोपींची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता सूचना दिलेल्या होत्या.
नमूद पथकाने सांगली जिल्हयातील गंभीर शरीराविरुध्दच्या गुन्हयावर लक्ष केंद्रीत करुन परागंदाआरोपी बाबत माहीती घेत मिरज उपविभागात पेट्रोलिंग करीत मिरज शहरातील दत्त चौक, मिरज येथे आले असताना पोकॉ/१०५६ प्रमोद साखरपे, पोना/१९९९ सुशिल मस्के, पोकॉ/१४७९ ऋतुराज होळकर यांना मिरज शहर पोलीस ठाणेकडील मोक्का गुन्हयातील परागंदा आरोपी नामे महमदशिराज ऊर्फ सोहेल आगलावणे राहणार-पाटील हौद, ब्राम्हणपूरी, मिरज हा म्हैशाळ रोड उड्डाणपूल, मिरज येथे येणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. मिळाले बातमीप्रमाणे नमूद पथक म्हैशाळ रोड उड्डाणपूल, मिरज येथे गेले असता पथकातील पोना/१९९९ सुशिल मस्के यांनी सदर परीसरात संशयीतरीत्या फिरत असलेल्या आरोपीस ओळखून तो मिळाले बातमीप्रमाणे महमदशिराज ऊर्फ सोहेल आगलावणे हा असल्याची खात्री झाली. त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव महमदशिराज ऊर्फ सोहेल अब्बास आगलावणे वय-२६ वर्षे राहणार-पाटील हौद, ब्राम्हणपूरी, मिरज असे सांगितले. सदर मिरज शहर पोलीस ठाणेकडील गुन्हयात सदर आरोपी हा गुन्हा घडलेपासून परागंदा असलेबाबत खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास मिरज शहर पोलीस ठाणे येथे रिपोर्टाने जमा केले आहे.
सदर गुन्हा हा दिनांक २८/०९/२०२५ रोजी दाखल असून सदर गुन्हयामध्ये निखील विलास कलगुटगी राहणार-वडर गल्ली, मंगळवार पेठ, मिरज याचा खून केला होता. त्यामध्ये एकूण १५ आरोपी व ०२ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे. सदर गुन्हयातील आरोपीनी यापूर्वी संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेने सदर आरोपी याचेवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियमाप्रामणे कारवाई करणेबाबत मा. श्री. सुनिल फुलारी सो, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांना प्रस्ताव पाठविलेला होता. सदरचा प्रस्ताव मंजूर झालेला असून सदर आरोपी हा गुन्हा घडलेपासून गेल्या ०६ महिन्यापासून परागंदा होता.
सदर गुन्हयाचा तपास श्री. विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा विभाग, विटा हे
करीत आहेत.
(








