सुप्रिया ठोंबरे मॅडम समाजासाठी झटणारी एक संवेदनशील कार्यकर्ती आणि पत्रकार आज काळाच्या पडद्याआड गेली. ठाणे मुंबई:- प्रतिनिधी दौलत सरवणकर . समाजासाठी झटणारी एक संवेदनशील कार्यकर्ती आणि पत्रकार आज काळाच्या पडद्याआड गेली “सुप्रिया ठोंबरे यांच्या निधनाने हळहळ; योगदान पोर्टल न्यूज व पर्व शैक्षणिक विश्वस्त संस्थेकडून भावपूर्ण श्रद्धांजली”
रुग्णसेवा करतच थांबला जीवनप्रवास; उपसंपादिका सुप्रिया ठोंबरे यांचे आकस्मिक निधन
मुंबई : समाजसेवा, रुग्णसेवा आणि अवयवदान जनजागृतीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या दैनिक लोकपरिवार समाचारच्या उपसंपादिका सुप्रिया ठोंबरे यांचे आकस्मिक निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सुप्रिया ठोंबरे या पर्व शैक्षणिक विश्वस्त संस्थेच्या अवयवदान विभागाच्या महाराष्ट्र महिला प्रमुख म्हणून कार्यरत होत्या.
“रुग्णसेवा करतच थांबला जीवनप्रवास; उपसंपादिका सुप्रिया ठोंबरे यांचे आकस्मिक निधन”
भावपूर्ण श्रद्धांजली
कै. सुप्रिया ठोंबरे
तसेच मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात त्या गेली अनेक वर्षे रुग्णसेविका म्हणून निस्वार्थ सेवा देत होत्या. रुग्णसेवा
हीच खरी मानवसेवा मानून त्यांनी अनेक गरजू रुग्णांना आधार देत समाजात माणुसकीचा संदेश दिला. अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यांत मोहिमा राबवल्या. त्यांच्या या कार्यामुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक विचार निर्माण झाला आणि अनेकांनी या पवित्र कार्यासाठी पुढाकार घेतला.
काही काळापूर्वी त्या कोल्हापूर येथे आल्या असताना सर्वांनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आंबप येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेऊन त्यांनी समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते. समाजासाठी धावून जाणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली होती.
त्यांच्या अचानक जाण्याने सामाजिक क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्र आणि अवयवदान चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
योगदान पोर्टल न्यूजचे संपादक सागर शेळके व पर्व शैक्षणिक विश्वस्त संस्थेचे प्रमुख प्रवीण वराडकर यांनी या दुःखद घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,
“सुप्रिया ठोंबरे मॅडम यांनी रुग्णसेवा आणि अवयवदान जनजागृतीसाठी आयुष्य झोकून दिले. रुग्णांची सेवा करत करत त्यांनी आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला, ही बाब समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जाण्याने समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.”समाजासाठी झटणारी एक संवेदनशील कार्यकर्ती आणि पत्रकार आज काळाच्या पडद्याआड गेली. “सुप्रिया ठोंबरे मॅडम यांना.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली.








