एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अकोला पोलीस दलातर्फे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ विषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

अकोला पोलीस दलातर्फे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ विषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील

अकोला पोलीस दलाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या महत्त्वपूर्ण कायद्याबाबत प्रशासकीय मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दि.१२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विजय सभागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे पार पडली. या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात स्वागताने करण्यात आली. पोलीस अधीक्षक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्या दरम्यान अकोला पोलीस दला तर्फे राबविण्यात येणाऱ्या सेवा व योजना बाबत माहिती दिली त्यामध्ये प्रोजेक्ट रक्षा मध्ये 8802 नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदविला आहे., चाटबॉट, द्वारे ऑनलाइन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती एक क्लिक वर नागरिकांना मिळू शकते. याबाबत ppt च्या माध्यमातून माहिती दिली.

मार्गदर्शक म्हणून राज्य लोकसेवा हक्क आयोग, अमरावती विभागाचे राज्य आयुक्त डॉ. किरण जाधव, भा.पो.से. (सेनि.) यांनी ई-सेवा प्रणाली, मध्ये महाराष्ट्र मधून उत्कृष्ट पोलीस अधीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक यांचे कौतुक करून अभिनंदन केले. अकोला पोलीसांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची माहिती मार्गदर्शन करतांना डॉ. किरण जाधव यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ हा कायदा महाराष्ट्रातील नागरिकांना विविध शासकीय सेवा निश्चित कालावधीत मिळाव्यात यासाठी करण्यात आला आहे. या कायद्यामुळे शासकीय कार्यालये नागरिकांना वेळेत सेवा देण्यास कायद्याने बांधील राहतात. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक व निश्चित वेळेत मिळाव्यात, शासकीय कामकाजातील विलंब कमी व्हावा तसेच भ्रष्टाचाराला आळा बसावा हा आहे. तसेच सेवा वेळेत न मिळाल्यास नागरिकांना तक्रार व अपील करण्याचा कायदेशीर अधिकारही या कायद्याद्वारे देण्यात आला आहे. असे सखोल मार्गदर्शन केले.

नागरिक खालील माध्यमांतून अर्ज करू शकतातः आपले सरकार सेवा केंद्र (CSC), संबंधित

शासकीय कार्यालय, ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार पोर्टल (Aaple Sarkar Portal) या कायद्याचे प्रमुख फायदे, या कायद्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळण्याची हमी प्राप्त होते. तसेच नागरिकांचे हक्क अधिक बळकट होतात, प्रशासनात पारदर्शकता वाढते आणि शासकीय कामकाजातील भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होते. असे आपले मत व्यक्त केले त्यानंतर मान्यवरांनी संबधित शाखा ची पाहणी करून कामकाजा बाबत माहिती घेतली.

या कार्यशाळेस डॉ. देवेंद्रजी चव्हाण, उपसचिव, राज्य लोकसेवा हक्क आयोग, अमरावती यांची उपस्थिती लाभली. तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध शाखांचे अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मार्गदर्शन कार्यशाळेमुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५ बाबत सखोल माहिती मिळाली असून प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्यास या उपक्रमाची मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यकरांचे आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक जीवीशा श्री गजानन धंदर यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link