एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वाटणी’ लघुपटाची ५ व्या देवगिरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृत निवड.

वाटणी’ लघुपटाची ५ व्या देवगिरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृत निवड.

प्रतिनिधी – सारंग महाजन

दिनांक: २० फेब्रुवारी २०२६
[ ​वडनेर भोलजी ] :

ग्रामीण कौटुंबिक नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘वाटणी’ (Vaatani) या लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. या लघुपटाची ५ व्या देवगिरी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२६ (5th Devgiri International Short Film Festival 2026) साठी अधिकृत निवड (Official Selection) झाली आहे. तसेच बुलडाणा नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये ही अधिकृत निवड (Official Selection) झाले आहे.

​अरविंद एंटरटेनमेंट अँड म्युझिक (Arvind Entertainment & Music) प्रस्तुत हा लघुपट श्री. प्रवीण लाड यांची निर्मिती असून, याचे दिग्दर्शन के. एल. आरती यांनी केले आहे. ग्रामीण भागातील कुटुंबाची विण, तिथले संघर्ष आणि भावनांचे चित्रण या लघुपटात अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील दर्जेदार चित्रपटांच्या स्पर्धेत ‘वाटणी’ ची निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​या यशाबद्दल बोलताना कलाकार, लेखक, दिग्दर्शक श्री. प्रविण लाड म्हणाले, “आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे ग्रामीण जीवनातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
मॉडेल, अ‍ॅक्टर व ​दिग्दर्शिका के. एल. आरती यांनी सांगितले की, “हा लघुपट केवळ एक कथा नसून ती एक भावना आहे. या निवडीचे श्रेय माझ्या सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांना जाते.”
​हा लघुपट लवकरच येत्या 1 मार्च ला जळगाव येथे महोत्सवाच्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, संपूर्ण सिनेसृष्टीतून ‘वाटणी’ च्या टीमचे अभिनंदन होत आहे.

या लघु चित्रपटात मलकापूर व वडनेर भो. येथील कलाकारांनी काम केले आहे, संपूर्ण चित्रीकरण हे वडनेर भो. येथे झाले असून या फिल्म चे प्रोड्यूसर श्री.आशिष लाड आहेत, या फिल्म चे दिग्दर्शन के. एल. आरती यांनी केले आहे, चित्रीकरण व संकलन प्रेम खराडे तर पार्श्व संगीत सुधीर कुमार यांनी केले आहे. जेष्ठ कलाकार श्री. भास्कर बावस्कर, शीलाबाई पैठणकर, प्रविण लाड, शुभम पाटील, अनिता ढाके, वैष्णवी तायडे, सुरज गिर्हे यांनी दमदार अभिनयातून या फिल्म ला न्याय दिला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link