एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रस्तरीय समितीची बैठक संपन्न

मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रस्तरीय समितीची बैठक संपन्न

 

अहिल्यानगर, :- पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबविण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या क्षेत्रस्तरीय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली.

या बैठकीत शेत रस्त्यांच्या कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ​या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते होते. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित उपस्थित होते.

बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या समस्या व शेत रस्त्यांची सद्यस्थिती यावर विचारविनिमय करण्यात आला. ‘शेतरस्ते म्हणजे केवळ रस्ते नसून तो शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे,’ या तत्त्वावर भर देत, योजनेतील कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा प्रशासनाकडून होऊ नये, अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

​शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. योजनेची व्याप्ती व महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.

*क्षेत्रीय समितीमध्ये शेतकऱ्यांनी सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी व मागण्या एकत्रितपणे व ठोस पुराव्यांसह समितीच्या बैठकीत प्रभावीपणे मांडाव्यात, जेणेकरून त्यांचे प्रकरणे तातडीने व न्याय्य निराकरण होण्यास मदत होईल.*

#बळीराजाशेतरस्ते #पाणंदरस्ते #अहिल्यानगर #पारनेर #नगर #शेतकरीप्रगती #ग्रामीणविकास #काशिनाथदाते #मुख्यमंत्रीयोजना #MaharashtraAgriculture #RuralConnectivity #FarmerFirst #DevelopmentNews
https://whatsapp.com/channel/0029Vb9ql4A42DcZbQiCG402
आपलाच एक शेतकरी भाऊ दादासाहेब जंगले पाटील 95 52 52 87 13 शिवपानंद चळवळ महाराष्ट्र राज्य

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link