एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नेकनूर पोलिसांच्या कारवाईत पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सिमेंटच्या गोणीतून गांज्याची तस्करी; दोघे ताब्यात

नेकनूर पोलिसांच्या कारवाईत पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चौसाळा प्रतिनिधी विवेक कूचेकर

 

नेकनूर पोलिसांनी गांज्याची तस्करीचे रॅकेट बुधवारी (दि.11) रात्री उघडकीस केले आहे. सिमेंटच्या गोणीतून गांज्याची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी एका शेतात छापा मारून याचा फर्दाफाश केला. या कारवाईत ११ किलो १५० ग्रॅम गांजा ज्याची किंमत २ लाख ७८ हजार ७५० रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे. नेकनूर पोलिसांनी यावेळी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केले.

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणी बुद्रुक गावात एका उसाच्या शेतात सिमेंटच्या गोणीत गांज्या भरून ठेवण्यात आला होता. याची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी व त्यांच्या टीमने छापा मारला. यावेळी शेतात दोन सिमेंटच्या गोणीत ११ किलो १५० ग्रॅम गांज्या पोलिसांना सापडला.

या गांज्याची तस्करी होणार असतानाच पोलिसांनी गुमानसिंग शिवराम पावरा (वय-३५,रा.बोरमल्ली पाडा,ता.शिरपूर,जि.धुळे) व मनोज सीताराम मेहता (वय१९,रा.बाखरली,ता.वरला,जि.बडवानी राज्य.मध्यप्रदेश) या दोघांना रंगेहात पकडले आहे. नेकनूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर हे करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link