सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुंबई आरे कॉलनी येथे दिवाळी भेटवस्तूचे वितरण.
प्रतिनिधी सारंग महाजन.
बुलढाणा जिल्हा मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील गेल्या पन्नास वर्षापासून सामाजिक कामात स्वतःला झोकून देऊन समाजकार्यात अग्रेसर असणारे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी ( नाना) यांनी रक्तदान शिबिर ,अपंगांना मदत करत समाजकार्य सध्या पण सुरू आहे. सुबोध सावजी यांच्या स्वर्गीय पत्नी यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून ट्रस्टच्या माध्यमातून महिलांसाठी लहान मुलांसाठी तसेच गरजू लोकांना मदत करीत आहे. मुंबई येथे स्थायिक असलेले सावजी यांचे सुपुत्र डॉ .राहुल यांनी सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई आरे कॉलनी युनिट 22 येथे दिवाळी भेटवस्तू वितरण कार्यक्रम पार पडला.
ट्रस्टच्या वतीने तिथे राहणाऱ्या लोकांच्या हितासाठी धर्मदाय पथोलॉजी सेवा सुरू केल्या आहे .प्रेमाचे प्रतीक म्हणून परिसरातील महिलांना डॉ. राहुल यांनी ट्रस्टच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील लोकांनी चॅरिटेबल ट्रस्टचे व डॉ .राहुल यांचे आभार मानले.
