मीटर प्रमाणे रिक्षा भाडे आकारणी करा अन्यथा मीटर रद्द करा.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, आणि टिटवाळा या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण MMRDA कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक यांची रिक्षांची भाडे आकारणी मीटर प्रमाणे करण्याची मागणी आहे. या परिसरातील सर्व मार्गांवर शेअर रिक्षांद्वारे वाहतूक केली जाते. रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशननंतर भाडे २३ रु वरून २६ रु झाले आहे, आणि हकीम समितीने शेअर रिक्षांच्या भाड्यात ३३% अतिरिक्त भाडेवाढ केली आहे. प्रत्येक प्रवाशाला अतिरिक्त ११% टक्के भाडेवाढीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. अतिरिक्त भाडेवाढी बद्दल ग्राहक संरक्षण कक्ष,प्रवासी संघटना यांच्या सोबत चर्चा केली नाही. या भाडेवाढीचा कोणताही फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत नाही. उलट, यामुळे प्रवासी ग्राहकांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
सद्यस्थितीत, रिक्षा मीटर केवळ शोभेची वस्तू बनले आहे. रिक्षावाले मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत आणि मनमानी पद्धतीने जास्त भाडे मागतात. शेअर रिक्षांमध्ये नियमांचे उल्लंघन करून तीनऐवजी चार प्रवासी घेतले जातात, ज्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भाड्याचा फटका बसतो आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष, खासदार मा.श्री. अनिलजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना श्री. ऋतुकांचन शंकर रसाळ कक्ष शहर संघटक कल्याण पुर्व ग्राहक संरक्षण कक्ष यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.आशुतोष बारकुल यांची भेट घेऊन चर्चा करुन निवेदन दिले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन रिक्षा भाडे मीटर प्रमाणे आकारणी करण्यासाठी परिवहन विभागाची चाचपणी सुरू आहे असे सांगितले.
मागण्या :-
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, आणि टिटवाळा या परिसरातील सर्व मार्गांवर रिक्षांनी मीटरप्रमाणे भाडे आकारावे.
स्टेशन परिसरात केवळ मीटर प्रमाणे भाडे आकारणी करण्याऱ्या रिक्षानाच थांबा देण्यात यावा.
शासनाने रिक्षा ला परवाना हा मीटर प्रमाणे भाडे आकारणी करण्यासाठी दिलेला आहे. यांची अंमलबजावणी परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांनी करावी.
याबाबतीत सहायक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण यांना ही निवेदन देण्यात आले आहे.
