ओबीसी मोर्चा हा जनभावनेचा उद्रेक
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
#नागपूर:
२ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीत घुसखोरी करणारा काढलेला हा काळा जीआर सरकारने रद्द करावा, या मागणीसाठी नागपूर मध्ये सकल ओबीसी विमुक्त भटक्या जाती जमाती समाजाच्या वतीने आज (ता १०) नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौकात मोर्चा पोहोचून तेथे जाहीरसभेत रूपांतर करण्यात आले.
या मोर्चात विदर्भाच्या काना कोपऱ्यातून मोठ्या संख्येने ओबीसी,भटक्या विमुक्तांच्या संघटना, बांधव सहभागी झाले होते. ओबीसी महामोर्चा संदर्भात बोलताना ओबीसी नेते आणि काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा मोर्चा म्हणजे केवळ आंदोलन नाही तर हा जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. या मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती माननीय अनिल भाऊ देशमुख माननीय सुनील भाऊ केदार माननीय उमेश कोरम साहेब व इतर नेते मंडळी होती या मोर्चात ओबीसी संघटना समवेत भटक्या विमुक्त संघटनांचे श्री मुकुंद अडेवार, श्री राजेंद्र बढिये, श्री महेश गिरी, श्री खिमेश बढिये, श्री आनंदराव अंगलवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
#OBCMorcha
#nagpur
#maharashtra
