एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुण्यात पीएमपी’च्या महिला वाहक आता होणार चालक :- अध्यक्ष पंकज देवरे यांची माहिती

पुण्यात पीएमपी’च्या महिला वाहक आता होणार चालक :- अध्यक्ष पंकज देवरे यांची माहिती..!!

प्रियांका देशमुख पुणे शहर प्रतिनिधी

सध्या सगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत शिवाय महिलांना 33 टक्के आरक्षण आहे. याच अनुषंगाने पीएमपीमधील इच्छुक वाहक महिलांना बस चालवण्याची प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना सुरुवातीला पुण्यदशम बसवर नियुक्ती करण्याचा आदेश उद्देश आहे. सुरुवातीला 15 ते 20 महिला वाहकानी चालक होण्यास तयारी दर्शवली आहे. पीएमपी मधील महिला वाहकांना चालक म्हणून काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी पीएमपीने इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग ऑफ अँड रिसर्च संस्थेमार्फत एक महिन्यांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आखला असून. या संबंधित एका दिवशीय कार्यशाळेचे आयोजन स्वारगेट मुख्यालयात हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी 15 ते 20 महिलांनी चालक प्रशिक्षण घेण्यासाठी तयारी दाखवली आहे अशी माहिती पुणे पीएमपी प्रशासनाकडूंन मिळाली आहे. पीएमपीकडूंन पुणे पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. सध्या पीएमपीमध्ये अठरा हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. कायमस्वरूपी पद भरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक महिला बालकांना चालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच त्या महिलांना लायसनदेखील आयडीटीआर काढून देण्यात येणार आहे. पुणे महानगर परिवहन मंडळात सध्या एकूण 220 महिला वाहक म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये 212 कायमस्वरूपी असून, आठ महिला वाहक या बदली कामगार म्हणून काम करतात. यामधील सुरुवातीली 15 ते 20 महिलांना चालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link