अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी मा. श्री. विशाल अडागळे यांची नियुक्ती
आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार
संपादक संतोष लांडे
निर्भीड, तडफदार व युवा पिढीचे धडाडीचे पत्रकार मा. श्री. विशाल अडागळे यांची अवघ्या तीस दिवसात जिल्हा उपाध्यक्ष पदावरून थेट पुणे जिल्हा अध्यक्षपदी पदोन्नती झाली आहे. या निमित्ताने युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये कार्यरत असलेले मा. श्री. विशाल अडागळे यांची राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री गणेश कचकलवार व विभागीय पदाधिकारी यांच्या वतीने एकमताने बिनविरोध पुणे जिल्हा अध्यक्षपदी तसेच मा. श्री गोपाल बांदल यांची भोर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आझाद रिक्षा चालक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा श्री. शफिक भाई पटेल यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
एका नामांकित कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून नोकरी करताना रिक्षा चालकांबद्दल असलेल्या आपुलकीमुळे तसेच व्यवसायाबाबत मिळालेल्या अनुभवातून त्यांनी स्वतः नोकरी सोडल्यानंतर विविध अडचणींचा सामना केला आहे. याबाबत बोलताना अडागळे म्हणाले की मी स्वतः रिक्षा चालवली आहे व रिक्षा चालकांच्या समस्या व अडचणी चांगल्या प्रकारे जाणतो तसेच जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतः व माझे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व सहकारी यांच्या समवेत रिक्षा चालकांच्या तसेच इतर सामाजिक प्रश्नाबाबत प्रामाणिकपणे प्रयत्न करून यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी खात्री देतो.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शफिक भाई पटेल, सहकारी मित्र महालिंग स्वामी तसेच संघटनेचे पदाधिकारी मुक्तार कोतवाल व सिम्मिनाज मुजावर आदि उपस्थित होते.
