एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

लोकअदालतीत जास्तीत जास्त सवलतीने वाहतूक दंड भरण्याची संधी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

लोकअदालतीत जास्तीत जास्त सवलतीने वाहतूक दंड भरण्याची संधी

संपादक संतोष लांडे 

हेल्मेट-सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट गाडी चालविणे… अशा अनेक छोट्या वाहतूक नियमभंगांचे प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची संधी पुणेकरांना बुधवारपासून शनिवारपर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत मिळणार आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांच्या दंडांमध्ये तडजोडीने जास्तीत जास्त सवलत दिली जाणार आहे. १० ते १३ सप्टेंबर दरम्यान येरवडा पोस्ट ऑफिसशेजारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरून पुणेकरांना थकबाकीमुक्त होता येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील, मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या पुढाकारातून यंदाच्या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांसाठी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दावे तडजोडीतून निकाली काढण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
….

खालील वाहतूक नियमभंगांचा दंड भरता येईल सवलतीत

– विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
– सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे
– सिग्नल तोडणे
– वेगमर्यादा ओलांडणे
– चुकीचे पार्किंग
– वाहन चालविताना मोबाइलचा वापर
– विनापरवाना, विना पीयूसी वाहन चालविणे
– फिटनेस प्रमाणपत्र नसणे
– चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे
– नंबरप्लेट नसणे
….

खालील गंभीर स्वरुपाच्या वाहतूक नियमभंगांचा दंड माफ होणार नाही

– मद्यपान करून वाहन चालविणे
– अपघात करून पळ काढणे
– निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघातास कारणीभूत होणे
– अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे
– अनधिकृत शर्यत
– गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर
– न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे
– अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने
…..

राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना वाहतूक चलनांचा प्रलंबित दंड सुलभपणे भरून कायदेशीरपणे थकबाकीमुक्त होता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
– न्या. महेंद्र महाजन, प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे
….

या उपक्रमातून नागरिकांना जास्तीत जास्त सवलतीत दंड भरून वाहतूक नियमभंगांची चलने तडजोडीने निकाली काढता येतील; तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृतीही होईल.
– न्या. सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
…..

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link