अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कर्तव्यदक्ष सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांची सदिंच्छा भेट.. पुरी गोसावी यांच्याकडूंन स्वागत..!!
संगीता इंनकर सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय कल्पना बारवकर मॅडम यांची जयहिंद नमस्कार मॅडम जी. असे म्हणत आज रोजी सांगली पोलीस मुख्यालय कार्यालयात संभाजी पुरी गोसावी सातारकरांनी सदिंच्छा भेट घेतली… कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून त्यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात चांगलेच ओळखले जाते. 3 जुलै 2025 रोजी त्यांनी सांगली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सांगली जिल्ह्यातील पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा एका अनुभवी महिला अधिकाऱ्याकडे सोपविली गेली आहे. कल्पना बारवकर या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून चांगल्याच ओळखल्या जातात. 2007 साली अकोला येथून पोलीस सेवेला प्रारंभ केला. त्यांनी बुलढाणा औरंगाबाद विविध ठिकाणी जबाबदारी पार पडली आहे. सन 2015 मध्ये त्यांची भंडारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली होती. तर पुढे पुणे पोलीस आयुक्तालय त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागांत व नांदेड परिक्षेत्रातही महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदाची देखील जबाबदारी पार पडली होती. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि नेतृत्वगुण जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी चांगलाच उपयुक्त ठरत आहे. सांगलीच्या यापूर्वीचे देखील अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून मनीषा दुबळे, आँचल दलाल डूडी, रितू खोकर यांनी या पदावर उत्कृंष्ट सेवा दिली. त्यानंतर आता कल्पना बारवकर या चौथ्यांदा महिला अधिकारी ठरल्या आहेत.
