अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अण्णा भाऊ साठे अभ्यासिका वाचनालय,अध्यक्षपदी मारोती एडकेवार व सचिव राजू आंजनिकर
मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : पत्रकार मारोती एडकेवार अध्यक्षपदी तर,राजू अंजनीकर सचिवपदी नियुक्ती. डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी,जयंती उत्सव साजरा करण्यात आला. व अण्णा भाऊ साठे यांच्या अभ्यासिका चे,उद्घाटन राधाजी कोटकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. व वाचनाचे समित गठीत करण्यात आली, या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पत्रकार मारोती जकोजी एडकेवार, उपाध्यक्ष हनुमंत भालेराव, सचिव राजू अंजनीकर, सहसचिव दीपक एडकेवार, ग्रंथलेखपाल राजू पिराजी अंजनीकर, कोषाध्यक्ष बालाजी एडकेवार,व सदस्य सायबू मरीबा एडकेवार,बजरंग शेट्टीबा गायकवाड, संभाजी संग्राम एडकेवार, अशी समिती गठीत मातंग समाजातील ज्येष्ठ नेते, व ज्येष्ठ कार्यकर्ते, व समाज अध्यक्ष भगवान एडकेवार,व समाजाचे नेते साहेबराव अंजनीकर, मा. उपसरपंच मारोती एडकेवार,बालाजी एडकेवार,भूमाजी अंजनीकर, सुरेश येडकेवार, राजू एडकेवार,संदीप एडकेवार, सर्व समाज सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती, पत्रकार मारोती एडकेवार यांनी,वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मातंग समाजाचे, विविध प्रश्न सोडवण्याचे काम करतात, समाजकार्य,आणि त्यांचे मोठे योगदान आहे. म्हणून आम्ही त्यांच्या वरती, जिम्मेदारी देत आहोत. व अभ्यासिका निर्माण करण्याची संकल्पना निर्माण करण्यासाठी धडपणारे, सचिव राजू भुमाजी अंजनीकर यांचा सुद्धा, समाजासाठी योगदान असल्यामुळे, या दोघांवरती आम्ही डॉ. आण्णा भाऊ साठे वाचनालयाची, जिम्मेदारी देत असल्याची, भावना मातंग समाजाने व्यक्त केले.
