अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
साताऱ्यात रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचा चौथा वर्धापन दिन उत्साहांत साजरा होणार :- संभाजी पुरीगोसावी सातारकर..!!
संगीता इंनकर सातारा जिल्हा प्रतिनिधी
जय हिंद सध्या आपला रोखठोक महाराष्ट्र हा ग्रुप सध्या पोलीस प्रशासनाच्या चांगलाच चर्चेत असून…. ग्रुपमधील सर्वच पत्रकारांच्या कामकाजावर प्रशासनाकडूंन तसेच रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे नेहमीच कौतुकांची थाप आहे. त्याच अनुषंगाने मागील दोन महिन्यांपासून पासून अनेकांनी आपल्या ग्रुप बद्दल गेट-टुगेदर व भंडारा घ्यावा असा संदेश मिळत होता त्याच अनुषंगाने आपण येत्या दिनांक ( 26) ऑक्टोबर रोजी रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचा चौथा वर्धापन दिन तसेच पत्रकार आणि अधिकारी यांचा परिचय मेळावा व गेट-टुगेदर कार्यक्रम येत्या २६ ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील पोलीस कर्मणूक केंद्रामध्ये भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांच्या निमिंत्ताने ग्रुपच्या टीमने कार्यक्रमांचे आयोजन पूर्ण उत्साहांत हाती घेतले असून, कोणत्याही व्यक्तीकडून आर्थिंक मदत न घेता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमात उत्कृंष्ट दैनिक संपादक आणि पत्रकारांचा गौरव करण्यात येणार असून, त्यांना फक्त ट्रॉफी प्रदान केली जाईल. त्या ट्रॉफीची फी संबंधितांकडे राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी वर्गाने या उपक्रमाबद्दल आपला आनंद व प्रेम व्यक्त करत “कार्यक्रमासाठी आम्ही मनापासून सहकार्य करणार” असा संदेश दिला आहे. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांचा नामोल्लेख न करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. अधिकारी वर्गाने रोखठोक महाराष्ट्र ग्रुपबद्दल दाखवलेले आत्मीयतेचे नाते आणि ऑनलाइन स्वरूपातील सहकार्य हीच त्यांची खरी मदत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने सर्व पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी वर्गांचे आभार मानण्यात आले असून, “आपण दाखवलेले प्रेम व विश्वास कायम राहील, आम्हीही आपल्या सेवेत तत्पर आहोत” असा विश्वास ग्रुपच्या टीमने व्यक्त केला आहे.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामुळे पत्रकारिता क्षेत्रातील निष्ठावान कार्याचा गौरव होईल, तसेच पत्रकार आणि अधिकारी यांच्यातील परस्पर संवाद, विश्वास व समन्वय अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोखठोक महाराष्ट्र ग्रुपची टीम संपादक मंगेश पवार ( पुणेकर ) संपादक महंमद शेख ( सांगलीकर ) संपादक संतोष लांडे ( पुणेकर ) संपादक चंद्रशेखर केंगारे ( लातूरकर )
