अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रोखठोक महाराष्ट्र एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात ! सोशल मीडिया किंग रिल स्टार अश्विनी पवार सध्या महाराष्ट्रांत चर्चेत…!!
संगीता इंनकर पुणे जिल्हा प्रतिनिधी
सध्या अनेक जण सोशल मीडियावर आपल्या कलेच्या माध्यमांतून महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यातून आपली ओळख आणि आपला जनसंपर्क निर्माण करत असतात. आणि त्याच अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सौ. अश्विनी ताई पवार यांना देखील सोशल सोशल मीडियाची पहिल्यापासूनच खूप आवड आहे. आपल्या आवडीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर सौ. अश्विनी ताई पवार यांचे नेहमीच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे चांगलेच दिसून येते. प्रथमदर्शनी रील स्टार सौ. अश्विनी ताई पवार या चर्चेत आल्यानंतर अनेक लोकांनी अश्विनीला व्हिडिओमुळे नावेबोटे ठेवली पण अश्विनीने आपली जिद्द आणि चिकाटी मात्र सोडली नाही, पतीच्या पाठिंब्यामुळे अश्विनीने सोशल मीडियावर आपले चांगलेच फॉलोअर्स निर्माण केले आहेत. कुठे एकदा छोटा… मोठा व्यवसाय चालू करण्यासाठी बोलवले जात असून आता त्यांच्यामध्ये एक आगळावेगळा मानाचा तुरा रोवला गेला आहे. आजही त्यांनी आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नाही आपला संसार मूल-बाळ नोकरी सांभाळून पण आपले नाव आज त्यांनी उंचावर नेण्याचा प्रयत्न चांगलाच केला आहे, अशा या सोशल मीडिया किंग रील स्टार सौ. अश्विनी ताई पवार यांच्या कार्याला रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन मानाचा सलाम आहे. आणि त्यांना पुढील सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत.*
