एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पारंपारिक गटई ठेल्यांऐवजी आधुनिक व्यवसाय साधनांची तरतूद करावी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

पारंपारिक गटई ठेल्यांऐवजी आधुनिक व्यवसाय साधनांची तरतूद करावी

समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेची शासनाकडे मागणी
गडचिरोली | प्रतिनिधी मनोज उराडे

दि. 27/8/2025:-

गडचिरोली येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे अनुसूचित जातीतील समाजबांधवांसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या पारंपरिक गटई ठेल्यांच्या योजनेत बदल करण्याची मागणी करण्यात आली. २६ ऑगस्ट २०२५ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त साहेब. समाज कल्याण विभाग गडचिरोली
मार्फत समाजकल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन
यांना निवेदन सादर केले.
यामध्ये पारंपरिक व्यवसायांवर उदरनिर्वाह करणे अवघड आहे.
आजच्या युगात शक्य नसल्याचे नमूद करित, समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणी बेरोजगार राहत असून ते नैराश्य व व्यसनाधीनतेकडे वळत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
संघटनेच्या वतीने निवेदनात, पारंपरिक गटाई ठेल्यांऐवजी तरुणांना स्वावलंबी होण्यासाठी ऑटो-रिक्षा, पिकअप, मेटॅडोर, कार यांसारख्या आधुनिक व्यवसाय साधनांसाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, उद्यमशीलता वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरे व कौशल्य विकास कार्यशाळा घेण्याचीही सूचना करण्यात आल्या.
या प्रसंगी समाजातील तरुणांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुधारित योजना तातडीने लागू कराव्यात, अशी एकमुखी मागणी समाजबांधवांनी केली. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले, प्रदेश महिला अध्यक्ष मायाताई मोहुर्ले, प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे, सचिव किशोर नरूले, सहसचिव संदीप येनगंटीवार, जिल्हा अध्यक्ष सुनील मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ते गुरुदास जिल्हेवार, नेमिचंद बोलीवार गोपीचंद मोहुर्ले तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link