एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलिसांची धमाकेदार कामगिरी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलिसांची धमाकेदार कामगिरी

पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत

बसमध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणा-या दोन आरोपीस मुद्देमालासह केले जेरबंद

दि.११/०८/२०२५ रोजी १०/०० वा. ते १०/३० वा. चे सुमा. बालाजीनगर ते एस.टी कॉलनी बीआरटी बसस्टापपर्यंत बसमध्ये पर्वती पुणे पर्यंत बस प्रवासा दरम्यान गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे गळयातील सोन्याची साखळी चोरुन नेली म्हणुन फिर्यादी यांनी अज्ञात अनोळखी इसमाविरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गुरनं. २५५/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशन चे तपास पथक प्रगारी पोलीस उप-निरीक्षक किरण पवार हे तपास करत असताना पोलीस अंमलदार सद्दाम शेख यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरुन सदरचा गुन्हा हा १) अमर शंकर जाधव, वय ३८ वर्षे, रा. पिंगळे वस्ती, पासपोर्ट ऑफिस, गंगा ऑर्चिड, ई वन ५ वा. मजला रुम नं. ७७, पुणे. २) निलेश शंकर जाधव वय ३६ वर्षे रा. रेणुका माता मंदिर गायरान वस्ती केशवनगर मुंढवा पुणे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास शिताफिने पकडुन त्याचे ताब्यातून दोन तोळे वजनाची सोन्याची चैन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-०३, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग, पुणे शहर श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, महेश मंडलिक, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, अमित चिव्हे, नानासो खाडे व राकेश सुर्वे यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link