अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भायखळा विधानसभा मतदारसंघातील आमदार मा मनोज पांडुरंग जामसुतकर यांनी आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश उत्सव मंडळाना मार्गदर्शन केले
प्रतिनिधी रायगड जिल्हा मुकूंद मोरे
शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे उपनेते भायखळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भायखळा विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सूचना आणि समस्यांबाबत उप आयुक्त परिमंडळ १ ई वॉर्ड साखळी स्ट्रीट भायखळा अग्निशामक दलाच्या पाठीमागे, भायखळा प येथे बैठक पार पडली.
या बैठकीला मुंबई मनपा आणि पोलीस प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंडळाच्या सदस्यांनी आपल्या समस्या मांडल्या आणि त्यावर सविस्तर चर्चा केली तसेच आमदार श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर यांनी आगामी गणेशोत्सव निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सोबत विधानसभा समन्वयक बबन
गावकर , उपविभागप्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, शाखाप्रमुख काका चव्हाण,रमेश रावल,निंगप्पा चलवादी,सलीम शेख, व शिवसैनिक त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते
