अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सर्व सामान्यांना न्याय देणाऱ्या वर्षा मीना यांनी अकोला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला… तर जिल्हाधिकारी अजित कुंभार नव्या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत..!!
संगीता इनकर मॅडम अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोल्याच्या नवे जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना यांनी बुधवारी दुपारी अकोला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. मावळ ते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या नवीन पदस्थापनेचे अद्याप आदेश जारी झाले नाहीत. सन 2018 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या वर्षा मीना या प्रथम अमरावती येथे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. नंतर त्यांची बदली जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली होती. नवीन जिल्हाधिकारी पदभार स्वीकारण्यापूर्वींच मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार मुंबईला रवाना झाले होते. तत्पूर्वी पदभार बाबतच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केली होती. ते अकोल्यात 25 जुलै 2023 रोजी रुजू झाले होते. अद्याप त्यांच्या पदस्थापनेचे आदेश जारी झालेले नाहीत त्यामुळे त्यांना मंत्रालयात किंवा पश्चिम महाराष्ट्रांत नियुक्ती मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी नूतन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून स्वागत करीत शुभेच्छा देण्यात आल्या.
